रत्नागिरी दिनांक 19 डिसेंबर : रत्नागिरी येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ ही गाडगेबाबा यांचा 67 वा पुण्यतिथी उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे .
पुण्यतिथीनिमित्त सकाळी 9 ते 10 श्री संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे पूजन, 10 ते 11 भजन, 11 वाजता लेप्रसी वसाहत येथे खिचडी वाटप आणि रिमांड रुम मध्ये खाऊ वाटप कार्यक्रम होईल. दुपारी 1 ते 3 पर्यंत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 ते 5या वेळात समाज बांधवांचा मेळावा होणार असून यावेळी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यामध्ये भाग घेतलेला विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच पाककला स्पर्धेत सुयश संपादन करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येईल. तसेच समाजातील गुणवंतांचाही गौरव करण्यात येईल. ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार करण्यात येईल. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू आणि 6 ते 7 या वेळेत लॉन्ड्री व्यवसायिकांची सभा घेण्यात येईल. रात्री 8.30 वाजता धुपारती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. पुण्यतिथी निमित्त परीट समाजाचे लॉन्ड्री व्यवसाय बंद राहतील. या पुण्यतिथी उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com