After the demand of Kiran Samant, the guardian minister gave the order*
गॅस एजन्सी मध्ये फक्त शहरातील ई. के. वायसी करा ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत मध्ये कॅम्प घेण्याची किरण सामंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मांगणी करत लोकांच्या अडचणीसाठी मार्ग काढण्याची विनंती केली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गॅस कनेक्शन चे e- kyc करण्याचे काम सुरु असून ठीक ठिकाणी असलेल्या एजन्सी मध्ये ग्रामीण भागातील गॅस कनेक्शन धारकांची गर्दी होत आहे. शनिवारी नेहमी प्रमाणे किरण सामंत आपल्या कार्यालयात जात असताना मारुती मंदिर येथील एका गॅस एजन्सी कडे ग्रामीण भागातील महिलांना जाताना पाहिले. त्यांनी आपल्या कार्यालयात आल्यावर माहिती घेतली असता गॅस कनेक्शन चे e-kyc सुरु असल्याचे समजले. ग्रामीण भागातील प्रत्येक गॅस कनेक्शन धारकला शहरात येणे ही बाब खर्चिक, आणि वेळ काढू असल्याने त्यांनी तात्काळ रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, उदय सामंत यांना निवेदन देउन जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये e-kyc कॅम्प आयोजित करण्याचे निवेदन सादर केले.
सदर निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हापुरवठा, अधिकाऱ्यांना अर्जा प्रमाणे कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. आपल्या कार्यालयात जाणाऱ्या किरण सामंत यांच्या लक्षात ही बाब आल्याने तात्काळ त्यांनी निवेदन सादर करून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचा होणारा त्रास, खर्चिक, बाब थांबविल्याने किरण सामंत यांचे आभार मानण्यात येत आहेत
www.konkantoday.com